सिल्लोड येथे विविध मागण्यासाठी जुक्टाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

सिल्लोड []  महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या आदेशानुसार येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील जुक्टा शिक्षक संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना विविध प्रलंबित न्याय्य मागण्यांचे  निवेदन पाठविण्यात आले.पेशकार आशीष आवटी यांनी निवेदन स्वीकारले.
  निवेदनात सर्वांना जुनी पेंशन योजना लागू करा, कायम विनाअनुदान तत्त्वावर मूल्यांकनास पात्र कनिष्ठ महाविद्यालयाची यादी घोषित करून त्वरित अनुदान द्या, माहिती तंत्रज्ञान विषय अनिवार्य करून अनुदानित करावा, 24वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांना विनाअट निवदश्रेणी देण्यात यावी आदींसह सतरा मागण्या करण्यात आल्या आहेत.
  निवेदनावर स्थानिक जुक्टा अध्यक्ष प्रा. मुरलीधर डापके, उपाध्यक्ष प्रा. शिवाजी वाठोरे, सचिव प्रा. नारायण डिघे, प्रा. शंतनू कदम,प्रा. दामोदर नरसिंगे, प्रा. चंद्रकांत  देबडवार, प्रा. सुनील पोवळे, प्रा. विवेक पिसे, प्रा. आर.आर. कोळी,प्रा. उदय योगी, प्रा. एस. बी. जोशी, प्रा. पी.एस.अक्कमवाड, डॉ. दत्ता काकडे, प्रा. एस.एस. लक्कस, प्रा.  पी. एस. गायकवाड, डॉ. शरद साखळे, प्रा. एकनाथ जंजाळ, प्रा. आर.आर. भोसले, प्रा. के. एन. मोरे, प्रा. जी. पी. डापके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
 

ताज्या बातम्या