नवी मुंबईत एमजीडीच्या वतीने आंतरराष्ट्रीय व्यवसाय परिषदेचे आयोजन

नवी मुंबई [] स्वतंत्र पूर्वकाळ ते आजच्या स्वतंत्र होऊन ७० वर्षा नंतर मातंग समाजाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असून मातंग समाजातील सुशिक्षित युवकांना उद्योग व्यवसायाकडे वळून आपली व समाजाची प्रगती करण्यासाठी मोठ्या संधी मिळत असून त्यासंदर्भात योग्य असे मार्गदर्शन मिळत नसल्याने समाजाचे अनेक होतकरू युवक गोंधळून दिशाहीन होत आहे हीच बाब   सुशिक्षित व सुदृढ समाज निमितीचा उद्देश घेऊन काम करणारया मातंग ग्रुप डेव्लमेन्ट म्हणजेच एमजीडीने हेरली असून एमजीडीच्या अंतर्गत एमजीडी इंडिया चेम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री (MICCI) मिक्की च्या वतीने रविवारी, 13 जानेवारी 2019 ला नवी मुंबई येथे एक दिवसाची बिझनेस कॉन्फ्रेंस (BIZCON-2019) आयोजित केली आहे.

 

या कार्यक्रमातून आपल्यातील नव-उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे, ज्यांना उद्योगात उतरायचे

कोणता उद्योग सुरू करने, कशा प्रकारे चांगले अणि सोपे आहे, तसेच सध्या जे उद्योग करत आहेत,  त्यांना शासकीय योजनांची योग्य माहीती मिळेल.आपल्या उद्योगाला अवश्यक असणारे भांडवल आपण कसे उभारू शकतो याच्या विविध वाटा अपनास लक्षात येतील. बीज भांडवल कसे उभा करायचे, मिटकॉन प्रोजेक्ट रिपोर्ट बनवणारी संस्था, वेंचर कैपिटल, विविध प्रोजेक्टस पैसे देणार्‍या संस्था, आंतरराष्ट्रीय निर्यातीच्या संधी या संदर्भातील मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

 

या आंतरराष्ट्रीय व्यावसायिक परिषदेस शारजाह , कनाडा , भारतातील उद्योजक व उद्योगक्षेत्रातील  मान्यवराचे मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहे. ही आंतरराष्ट्रीय व्यवसायीक परिषद यशस्वी करण्यासाठी सुनील वारे, सुदाम धुपे, शशीकांत घोडे , आनंद कांबळे , क्रांतीचंद भावे , तुकाराम साठे, सतीश कसबे, आदीसह एमजीडीचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेस देशभरातील मांतंग समाजाचे उद्योजक, युवावर्ग  उपस्थित राहणार आहे.

 

 

ताज्या बातम्या