अयोध्या प्रकरणी येत्या १० जानेवारी रोजी पुढील सुनावणी

राम जन्मभूमी-बाबरी मशीद जमिनीच्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावर कोर्टाने केवळ ६० सेकंदामध्येच निर्णय देत १० जानेवारीला पुढील सुनावणी होईल असे सांगितले. सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्या. संजय किशन कौल यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी ठेवण्यात आली होती. पक्षकारांच्या दोन्ही बाजूंनी कोणतीही बाजू मांडण्यात आली नसल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

त्यामुळे आता १० जानेवारीला हे प्रकरण पुन्हा एकदा दोन न्यायमुर्तींच्या खंडपीठासमोर दाखल होईल. त्यानंतर ते याला तीन न्यायमुर्तींच्या खंडपीठाकडे हस्तांतरीत करतील. मात्र, अद्याप या तीन सदस्यांच्या खंडपीठाची निर्मिती होणे बाकी आहे. त्यामुळे आता १० जानेवारीलाच ते तीन न्यायमुर्ती कोण असतील हे स्पष्ट होईल.

 

ताज्या बातम्या