औरंगाबाद- महापालिकेने पाठविलेली घर पाडण्याची नोटीस रद्द करून देतो, असे सांगत नराधमाचा विवाहितेवर अत्याचार

औरंगाबाद [] विना परवाना बांधकाम केल्याची महापालिकेने पाठविलेली नोटीस रद्द करून देतो, असे सांगत घरात घुसलेल्या ओळखीच्या तरूणाने विवाहितेवर अत्याचार  केला. याबाबत कोठेही वाच्यता केल्यास, जीवे मारेल, अशी धमकी देऊन आरोपी पळून गेला. ही खळबळजनक घटना, २६ डिसेंबर रोजी रात्री साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान बेगमपुरा परिसरात घडली. या घटनेने घाबरलेल्या पीडितेने घटनेनंतर चार दिवसांनी १ जानेवारी रोजी बेगमपुरा ठाण्यात फिर्याद नोंदविली.

 

महिनाभरापूर्वी जाधव नावाच्या एका व्यक्तीसोबत तिची ओळख झाली होती. त्यावेळी तुमच्या घराचे काम करून देतो, असे तो पीडितेला म्हणाला होता. तुम्हाला आलेली नोटीस मला दाखवा,असे तो म्हणाला होता. तोंड ओळख असलेला जाधवचे पूर्ण नावही पीडितेला माहिती नाही. तो तिला अधून-मधून मोबाईलवर बोलत. २६ रोजी रात्री सात वाजेच्या सुमारास पीडितेचा पती कामावर होता. पीडिता घरी एकटीस असल्याची संधी साधून जाधव बळजबरीने पीडितेच्या घरी गेला. तुमच्या घराचे काम करून देतो, असे म्हणून त्याने तिला आतल्या खोलीत ओढत नेत तिचे तोंड दाबून तिच्यावर बळजबरी केली. तिला जीवे मारण्याची धमकी देत आरोपी तेथून निघून गेला. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केल्याची माहिती पोलीसनी सांगितले आहे.

 

ताज्या बातम्या