खेलो इंडिया स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – नीलम कपूर

पुणे [] खेलो इंडिया स्पर्धेच्या आयोजनाचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (साई) महासंचालक नीलम कपूर यांन आज केले.

महाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या सभागृहात खेलो इंडिया स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी स्पोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या महासंचालक नीलम कपूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.

देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील शालेय वयोगटांच्या खेळाडूंना चालना मिळावी यासाठी खेलो इंडिया या स्पर्धेचे देशपातळीवर आयोजन करण्यात येते. यावर्षी या स्पर्धेच्या आयोजनाचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे. ही स्पर्धा यशस्वी करून इतर राज्यांसमोर महाराष्ट्राने आदर्श निर्माण करावा. या स्पर्धेत सहभागी होणारे खेळाडू हे शालेय वयोगटातील असल्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आपल्यावर आहे. हे सर्व खेळाडू अल्पवयीन असल्याने संयोजन समितीने अधिक काळजीपूर्वक नियोजन करण्याची असल्याचे नीलम कपूर बोलत होत्या.

या स्पर्धेच्या आयोजनात आरोग्य विभागाची भूमिका ही अत्यंत महत्त्वपूर्ण असून क्रीडा प्रकारांच्या अनुषंगाने आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरविण्यात याव्यात. स्पर्धा पाहण्यासाठी सर्वांसाठी खुली व मोफत आहे. स्पर्धा पाहण्यासाठी अधिकाधिक शालेय विद्यार्थी आणि पालक यावेत यासाठी विशेष प्रयत्न करावेत. स्पर्धा कालावधीत नियुक्त करण्यात येणारे स्वयंसेवक निवडताना चांगल्या प्रकारे निवडा व त्यांना चांगल्या प्रकारे प्रशिक्षण देण्याच्या सूचना नीलम कपूर यांनी दिल्या.

या बैठकीला शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, स्पोर्टस् अॅथॉरिटी ऑफ इंडियाचे उपमहासंचालक संदीप प्रधान, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, “पीएमआरडीए”चे आयुक्त किरण गित्ते, संयोजन समितीचे अध्यक्ष तथा उपसचिव (क्रीडा) राजेंद्र पवार, स्पोर्टस् अॅथॉरिटी ऑफ इंडियाचे सचिव श्री.छाबरा, संयोजन समितीचे सचिव तथा सहसंचालक (क्रीडा) एन. एम. सोपल आदी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

two × 5 =

ताज्या बातम्या