९ जानेवारीपासून पुण्यात ‘खेलो इंडिया’ स्पर्धेस सुरूवात – क्रीडामंत्री विनोद तावडे

नवी दिल्ली  []   महाराष्ट्राला मिळालेल्या यजमान पदाचे सोने करू या; सगळ्या खेळाडूंचे स्वागत करू या, अशा शब्दात 9 जानेवारी 2019 पासून सुरू होणाऱ्या ‘खेलो इंडिया-2019’ शालेय क्रीडा स्पर्धेचे यजमान पद महाराष्ट्राला घोषित झाल्यानंतर क्रीडा व सांस्कृतिक मंत्री  विनोद तावडे यांनी ही प्रतिक्रिया आज येथे दिली.

नवी दिल्लीतील ताज हॉटेलमध्ये  ‘खेलो इंडिया’ 2019 च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राला खेलो इंडियाचे यजमान पद मिळाल्याचे जाहीर केले. या कार्यक्रमात केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) कर्नल राज्यवर्धन राठोड,महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री श्री.तावडे, व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. खेलो इंडिया -2019 हा कार्यक्रम भारतीय क्रीडा प्राधिकरण,केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालय, महाराष्ट्र शासन आणि स्पोर्टस् इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात आयोजित होणार आहे.

महाराष्ट्राला मिळालेल्या यजमान पदाचे सोने करू या, सगळ्या खेळाडूंचे स्वागत करू या 

क्रीडामंत्री श्री.तावडे म्हणाले, महाराष्ट्राला मिळालेल्या यजमान पदाचे सोने करू या… या शब्दात महाराष्ट्राला मिळालेल्या यजमान पदाचे स्वागत श्री.तावडे यांनी यावेळी केले.

श्री.तावडे म्हणाले, खेलो इंडिया म्हणजे सतत खेळा.  लहानपणापासूनच मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण करा. त्यांच्यातील खेळाचे कौशल्य ओळखून त्यांचा विकास करा. प्रधानमंत्री आणि केंद्रीय क्रीडामंत्री यांच्या प्रयत्नातून ‘खेलो इंडिया’ पर्वाची सुरूवात झाली. या शालेय स्तरावरील क्रीडा स्पर्धा प्रथम  देशाच्या राजधानीत आयोजित झाल्या होत्या. यामध्ये महाराष्ट्राने द्वितीय क्रमांक पटकावला होता.

2019 मध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी विविध राज्यांमधून केवळ महाराष्ट्राला यजमान पदाचा मान मिळाला, असे सांगून श्री.तावडे म्हणाले,यजमान पद मिळाल्यामुळे आपल्या मातीतील खेळाडूंना मैदानात येऊन प्रोत्साहन देता येईल तसेच देशभरातील सर्वोत्कृष्ट खेळाडू राज्यात येतील. त्यांचा खेळ बघायला मिळेल, त्यांच्यापासून प्रेरणा घेता येईल. त्यातून क्रीडा संस्कृतीला पोषक वातावरण तयार होईल.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

14 − nine =

ताज्या बातम्या