बडनेरा विश्रामगृह ते प्रजिमा ७४ चे साडेचार कोटींच्या निधीतून काँक्रिटीकरण- प्रवीण पोटे

अमरावती []  केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गतिमान निर्णय घेत रस्ते विकासासह अनेक प्रकल्प व योजनांना चालना दिली. त्यामुळे राज्यात व अमरावती जिल्ह्यातही मोठे निर्माण कार्य होत आहे, असे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी आज येथे सांगितले.

बडनेरा विश्रामगृह ते प्रजिमा ७४ या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन श्री. पोटे-पाटील यांच्या हस्ते आज झाले. महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष विवेक कलोती, तुषार भारतीय, शिवराय कुलकर्णी, जयंत डेहणकर, नितीन धांडे, कार्यकारी अभियंता विभावरी वैद्य, उपअभियंता श्री. रंभाळ आदी यावेळी उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या बडनेरा उपविभागाद्वारे सुमारे चार कोटी ५३ लाख रुपयांच्या निधीतून हा रस्ता आकारास येणार आहे. या निधीतून 1.10 कि. मी. रस्त्याचे काँक्रिटीकरण, रस्त्याच्यामध्ये दुभाजक बसविणे व रस्ता शोल्डरसाठी पेव्हर आदी कामे होणार आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर होत आहेत. गतिमान संपर्क यंत्रणा व पायाभूत सुविधांमुळे विकासाला गती मिळाली आहे, असे श्री. पोटे पाटील यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पालकमंत्र्यांनी बडनेरा रेल्वे स्थानकासमोरील रस्त्याचीही पाहणी केली. रस्ता तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. कार्यक्रमाला अजय सारस्कर, ऋषी खत्री, सचिन रासने, राजेश साहू, तुषार वानखडे, श्री. ठाकरे, नीलेश काजे यांच्यासह बडनेरा व अमरावतीतील अनेक नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.